सोयाबीन शेतीचे तात्काळ पंचनामे करा- आ. कल्याणकर

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी बोगस बियाणे पेरलेल्या शेतात जाऊन पाहणी केली आहे. अशा शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ. कल्याणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरणीला जोरदार सुरुवात झाली आहे. अनेक भागात खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने, शेतकऱ्यांनी आर्थिक संकटावर मात करीत बी- बियाणे खरेदी केले. मात्र बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक उगवले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शिवाय शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. बनावट बियाणे तयार करणाऱ्या आणि उगवण क्षमता नसलेले बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच आ. बालाजी कल्याणकर यांनी दिले आहेत. आता पुन्हा आ. कल्याणकर यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन, बोगस बियाणे पेरलेल्या शेतात जाऊन पाहणी करीत आहेत. 

बियाणे उगवले नसलेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा
 

हस्सापूर, नसरतपूर, सूगाव(खू), सूगाव (बू), कोटितीर्थ, थुगाव परिसरात जाऊन आ. कल्याणकर यांनी शेतीची पाहणी केली. यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी आ. कल्याणकर यांच्यासमोर अनेक समस्या सांगितल्या. यावर आ. कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना धीर देत, बियाणे उगवले नसलेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचेही आ. कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले. 

यांची होती उपस्थिती 

यावेळी आ. कल्याणकर यांच्या सोबत कृषी अधिकारी श्री पवार, कृषी अधिकश्री बारसे, मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे, तलाठी सचिन नरवाडे, शिवसेना तालुका संघटक नवनाथ काकडे, उपतालुकाप्रमुख संतोष भारसावडे, रंगनाथ सरोदे, बळीराम सरोदे, पांडूरंग शिंदे, माजी सरपंच बालाजी वाघमारे, माधव माहराज हिंगमिरे, प्रदिप सरोदे, राजू वाघमारे, गणपत वाघमारे व इतर नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com